क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार माहिती मराठी | Sports Award Information Marathi
क्रीडा पुरस्कारची माहिती | राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार| क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार
खेळ म्हटलं की जोश, उत्साह, स्पर्धा, हार-जीत इ. हे सर्व गोष्टी येतात. त्यासोबत जर एखादा खेळाडू एखाद्या विशिष्ट खेळामध्ये सतत उत्कृष्ट कामगिरी करत असेल तर त्यासाठी त्याला पुरस्कार दिला जातो. म्हणजेच चॅम्पियन्सना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार हा नेहमीच सर्वोत्तम मार्ग आहे.
या पुरस्कारांमध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) ट्रॉफी आणि राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार यांचा समावेश आहे.
क्रीडा पुरस्कारे ही एक उत्कृष्टता आणि प्रगतीचं परिचय करवून देतात. हे पुरस्कार राष्ट्रीय स्तरावर किंवा राज्य स्तरावर असतात या लेखांमध्ये आपण राष्ट्रीय स्तरावरील कोणते क्रिडा पुरस्कार दिले जाते याविषयी माहिती बघणार आहोत
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार यादी
| नं | पुरस्काराचे नाव |
|---|---|
| 1. | राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार |
| 2. | द्रोणाचार्य पुरस्कार |
| 3. | अर्जुन पुरस्कार |
| 4. | मेजर ध्यानचंद पुरस्कार |
| 5. | मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी |
| 6. | राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार |
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारची माहिती
खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल खालील क्रिडा पुरस्कार दिले जातात :
1. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
'राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार' हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. या पुरस्काराची सुरुवात १९९२ पासून सुरू झाली.
चार वर्षे क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपक आणि सर्वाधिक उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो.
पदक व रोख रक्कम रु. २५ लाख व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे आणि राष्ट्रीय क्रीडा दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो.
2. द्रोणाचार्य पुरस्कार
'द्रोणाचार्य पुरस्कार' हा आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवून देणार्या खेळाडूंना प्रशिक्षण देणार्या प्रशिक्षकांसाठी हा पुरस्कार केंद्र सरकारकडून देण्यात येतो.
या पुरस्काराची सुरुवात १९८५ पासून झाली.
या पुरस्कारामध्ये ” द्रोणाचार्यांचा कांस्य पुतळा , प्रमाणपत्र, औपचारिक पोशाख आणि ₹ १५ लाख रोख पारितोषिक ” यांचा समावेश आहे.
3. अर्जुन पुरस्कार
'अर्जुन पुरस्कार' हा क्रीडा क्षेत्रातील भारतातील दुसर्या क्रमांकाचा पुरस्कार आहे आणि याची सुरुवात १९६१ पासून करण्यात आली.
या पुरस्कारामध्ये ” अर्जुनाचा कांस्य पुतळा , प्रमाणपत्र, औपचारिक पोशाख आणि ₹ १५ लाख रोख बक्षीस ” यांचा समावेश आहे.
4. मेजर ध्यानचंद पुरस्कार
१९९१-१९९२ मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्नची स्थापना करण्यात आली. ध्यानचंद पुरस्काराचे नाव महान भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या नावावरुन आहे. गेल्या चार वर्षांच्या कालावधीत “खेळाडूच्या सर्वात उत्कृष्ट कामगिरीसाठी” खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो.
या पुरस्कारामध्ये "एक पदक , प्रमाणपत्र आणि रोख बक्षीस ₹५ लाख ” यांचा समावेश आहे.
5. मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी
मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफीची स्थापना १९५६-५७ मध्ये झाली. गेल्या एक वर्षाच्या कालावधीत आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला ही ट्रॉफी दिली जाते.
6. राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार
राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्काराची स्थापना २००९ मध्ये करण्यात आली. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत “क्रीडा प्रोत्साहन आणि खेळाच्या विकासात लक्ष घालणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला हा पुरस्कार दिला जातो.
