जाणून घ्या वसुबारस माहीती मराठी, महत्त्व आणि पुजाविधी 2024

  वसुबारस माहीती मराठी, महत्त्व आणि पुजाविधी 2024 | vasubaras in marathi | vasubaras mahiti marathi

   आपल्या भारतीय संस्कृतीतील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी. हा सण मनाला आनंद देणारा, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा आहे. अशा या सणाची सुरुवात होते वसुबारस (vasubaras) म्हणजेच गोवत्स द्वादशी या दिवसापासून.

आश्विन कृष्ण द्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. हा सण वस्तूतः वेगळा आहे पण; वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो. 

 यंदा वसूबारस ही 28 ऑक्टोबरला आहे. 28 ऑक्टोबर सोमवारी हा सण साजरा केला जाणार आहे. वसूबारसच्या दिवशी गाई-वासराची पूजा केली जाते. त्यांची पूजा करून त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो.

वसुबारस माहीती मराठी  ( Vasubaras mahiti marathi )

   सनातन संस्था या वेबसाइटनुसार, श्री विष्णूच्या आपतत्त्वात्मक लहरी कार्यरत होऊन ब्रह्मांडात येण्याचा दिवस म्हणजे वसुबारस ! असे म्हणतात की या दिवशी कामधेनू या लहरींचे वहन ब्रह्मांडापर्यंत करते. या दिवशी या कामधेनूचे म्हणजेच गाय उभी करून तिचे प्रतिकात्मक रूपात पूजन केले जाते.

   या दिवशी आपल्या अंगणातील गाईला वासवदत्तचे स्वरुप प्राप्त होते म्हणजेच तिचे बारसे होऊन तिला देवत्व प्राप्त होते. यासाठीच या दिवसाला वसुबारस असे म्हणतात. 

वसुबारस सणाचा इतिहास 

दिवाळी हा सण साजरी करण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे. आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. गाई-गुरे यांना एक महत्त्वाचे स्थान आपल्या प्रत्येकाच्या घरात आहे. म्हणून गाई तसेच इतर जनावरांबद्दल कृतज्ञता दाखवण्याचा दिवस म्हणजेच वसुबारस. या दिवशी संध्याकाळी गाईची आणि तिच्या वासराची पूजा करतात. 

समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनुला उद्देशून हा सण साजरा केला जातो अशी एक कथा या सणाची आहे.
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url