समजून घेऊया क्यूसेक आणि टीएमसी म्हणजे काय? | Cusec and TMC meaning in Marathi

  क्यूसेक म्हणजे काय? टीएमसी म्हणजे काय?

  Cusec and TMC meaning in Marathi

  जून महिन्यापासून पावसाळा सुरू होतो. चांगला पाऊसामुळे धरणे भरत आहेत, काही धरणांतून पाणीही सोडले जात आहे. ठिकठिकाणांहून मुसळधार पावसाच्या, बंधारे-धरणे भरल्याच्या आणि धरणातून पाणी सोडण्याच्या बातम्या येत असतात. कुठे किती आणि कसा पाऊस झाला, त्याच्याही बातम्या येत राहतात. 

  अनेकदा हा पाऊस मिलीमीटर्समध्ये, सेंटीमीटरमध्ये अथवा इंचात मोजला गेल्याचे आपल्याला पहायला मिळते. पाऊस अशा विचित्र युनिटमध्ये कसा काय मोजतात, याचेही कुतूहल बर्‍याचदा आपल्याला असते.

 शिवाय धरणातून सोडलेल्या पाण्याबाबतही आज एक हजार क्युसेक पाणी धरणातून सोडण्यात आले,' असेही आपल्याला वाचायला अथवा ऐकायला मिळते.

  परंतु क्यूसेक म्हणजे काय? टीएमसी म्हणजे काय? काय आहेत ही गणिते? चला तर मग जाणुन घेवूया...

क्यूसेक आणि टीएमसी म्हणजे काय? | Cusec and TMC meaning in Marathi

वाहते पाणी मोजण्याची एकके

वाहते पाणी मोजण्याची दोन एकके आहेत:
१) क्युसेक
२) क्युमेक
     यांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे:

क्युसेक(cusec) म्हणजे काय ?

  धरणातून पाणी सोडताना पाण्याचे प्रमाण क्युसेकमध्ये मोजले जाते. क्युसेक या शब्दाची व्युत्पत्ती खालीलप्रमाणे आहेत:

   क्युसेक= क्युव + सेकंद

 एक घनफूट प्रती सेकंद म्हणजेच एक क्युव पर सेकंद याचा अर्थ क्युसेक असा होतो. 

क्युसेकमध्ये पाणी घनफूटामध्ये मोजले जाते. एका सेकंदास एक घनफूट पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्यूसेक होय. या प्रमाणात एका सेकंदात २८.३ लिटर पाणी बाहेर पडते. 

  ज्यावेळी खडवासला धरणातून १००० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातो, त्यावेळी १००० २८.३१ असे २८,३१० लिटर्स पाणी प्रती सेकंदाला नदीपात्रात सोडले जाते, कोणत्याही धरणातून जर २४ तासात सतत ११,५०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला, तर त्या धरणाची पातळी २४ तासांनंतर १ टीएमसीने कमी झालेली असते.

क्युमेक (Cumec) म्हणजे काय

क्युमेकमध्ये पाणी घनमीटर्समध्ये मोजले जाते. एका सेकंदास एक घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युमेक होय. या प्रमाणात एक सेकंदात १००० लिटर पाणी बाहेर पडते.

धरणातल्या पाण्याची मोजणी 

धरणसाठ्यातील पाणीसाठा टीएमसीमध्ये मोजला जातो.

एक टीएमसी पाणी म्हणजे काय?

१ फूट x १ फूट x १ फूट म्हणजे १ घनफूट पाणी

१ घनफूट म्हणजे २८.३१ लिटर्स पाणी

२८.३१ लिटर्स पाणी म्हणजे अंदाजे दोन बादल्या पाणी

१ दशलक्ष घनफूट (१एमसीएफटी) म्हणजे १०,००,००० घनफूट पाणी

१,००० दशलक्ष घनफूट म्हणजे १ टीएमसी पाणी (एक अब्ज घनफूट पाणी)

एक टीएमसी म्हणजे one thousand millions cubic feet म्हणजे एकावर नऊ शुन्य (०१ अब्ज) इतके घन फूट. १ टीएमसी = २८,३१६,८४६,५९२ लिटर्स

 महाराष्ट्रातील क्षमतेने मोठी असलेली धरणे

१) उजनी - ११७.२७ टीएमसी

२) कोयना - १०५.२७ टीएमसी

३) जायकवाडी - १०२.७३ टीएमसी

४) पेंच तोतलाडोह - ३५.९० टीएमसी

५) पूर्णा येलदरी - २८.५६ टीएमसी

पूर रेषा कोणत्या आहेत? त्या कशा आखतात?

पांढरी रेषा -

एखाद्या धरणातून ३०,००० क्युसेक वेगाने पाणी सोडले असता, त्या नदीपात्राची पाणीपातळी जेथे पोहोचेल, ती रेषा व्हाईट लाईन' अथवा पांढरी रेषा' म्हणून ओळखली जाते. हा सर्वसामान्य पूर मानला जातो.

निळी रेषा

२०-२५ वर्षातून एखाद्या वेळेस नदीचे पात्र पांढरी रेषा ओलांडते. ज्यावेळी धरणातून ६०,००० क्युसेक वेगाने पाणी सोडले असता, त्या नदीपात्राची पाणीपातळी जेथे पोहोचेल, ती रेषा ब्लू लाइन' अथवा निळी रेषा' म्हणून ओळखली जाते.

लाल रेषा

४०-५० वर्षात अतीवृष्टीने नदीचे पात्र निळी रेषाही ओलांडते. ज्यावेळी धरणातून १,00,000 क्युसेक वेगाने पाणी सोडले असता, त्या नदीपात्राची पाणीपातळी जेथे पोहोचेल, ती रेषा रेड लाईन' अथवा लाल रेषा' म्हणून ओळखली जाते.

 तर वाचकांनो, क्युसेक म्हणजे काय आणि टीएमसी म्हणजे काय हे तुम्हाला नक्कीच समजले असेल.

 मी आशा करतो कि तुम्हाला क्यूसेक आणि टीएमसी म्हणजे काय? | Cusec and TMC meaning in Marathi हा लेख आवडला असेल. 

 जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा कारण तुमची एक छान कमेंट आम्हाला अजून नवीन लेख लिहिण्यास ऊर्जा देते आणि ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत नक्की share करा.
Next Post Previous Post
5 Comments
  • Unknown
    Unknown २१ ऑक्टोबर, २०२१ रोजी ८:५५ PM वाजता

    हो सर कळलं अह्माला टँक्यू.

    • Vishal Sarode
      Vishal Sarode १६ डिसेंबर, २०२१ रोजी ४:३४ PM वाजता

      तुम्हाला आमची ब्लॉग पोस्ट आवडली याचा आम्हाला आनंद आहे. धन्यवाद ! 🙏🙏

    • निनावी
      निनावी १९ मार्च, २०२३ रोजी ७:०५ AM वाजता

      खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद सर

  • निनावी
    निनावी ११ जुलै, २०२२ रोजी ७:४९ PM वाजता

    छान माहीती गोधळ नाही

  • निनावी
    निनावी १९ एप्रिल, २०२३ रोजी ९:०४ AM वाजता

    Khup chhan

Add Comment
comment url