1 जूनला जास्त वाढदिवस असण्याचे कारण काय?
आज एक जून ! म्हणजे बड्डे दिन🎂🎂
जर तुम्ही आज नीट लक्ष दिलं तर तुमचे आजोबा, मित्राचे बाबा, मैत्रिणीची मावशी, आजूबाजूचे, ओळखीपाळखीचे यांच्यापैकी कोणाचा ना कोणाचा वाढदिवस 1 जूनला असतोच.
तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, जुन्या पिढीतील लोकांचा 1 जून हा जन्मदिवस का आहे... अनेकांची जन्मतारीख 1 जून का आहे....
बरोबर ना!
चला तर मग जाणून घेऊया त्यामाचे कारण!!
पूर्वी जन्म-मृत्यूची नोंदणी करण्याबाबत एवढी जागरूकता नव्हती. तेव्हा आपलं मुलं कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला जन्माला आलंय हे देखील अनेक आई-वडिलांच्या लक्षातही नसायचं. तेव्हा आतासारखी रुग्णालयातही बाळंतपण व्हायची नाहीत त्यामुळे जन्मतारीख, वेळ, दिवस यांची नोंदणी ठेवण्याचा प्रश्नच येत नव्हता.
पुढे ही मुलं जेव्हा मोठी झाली, शाळेत जाण्याची वेळ आली तेव्हा अनेकांना आपली जन्मतारीखच माहिती नसायची. तेव्हा अशा मुलांना शिक्षक १ जून ही जन्मतारीख द्यायचे. त्यामुळे शाळेत प्रवेश घेणं अधिक सोपं झालं.
दुसरे कारण असे की, काहींचे वडील नोकरी करणारे होतं. त्यामुळे बदल्याही खूप व्हायच्या. या गोंधळात काहींचे महत्त्वाची कागदपत्रं देखील हरवायची. त्यामुळे मुलांच्या जन्मतारखेची नोंद असलेली कागदपत्रंही सापडायची नाहीत. पुढे इतर शैक्षणिक ठिकाणी किंवा नोकरीच्या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना अडचणी यायच्या.
तेव्हा या मुलांचा जन्माचा सबळ पुरावा नसल्याने त्यांची जन्मतारीख मात्र १ जूनच करत असत. त्यामुळेच या सगळ्यांचे वाढदिवस हे १ जूनलाच येतात.
तर मित्रांनो, 1 जूनला जास्त वाढदिवस असण्याचे कारण काय हे तुम्हाला समजले असेल. तर ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि त्यांना देखील कळू द्या, 1 जूनची कथा!
