जागतिक वसुंधरा दिन का साजरा करतात - सविस्तर माहीती | World Earth Day Information Marathi

 जागतिक वसुंधरा दिवस | जागतिक वसुंधरा दिन माहिती | World Earth Day Information in Marathi| earth day theme

  दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा करतात. परंतु वसुंधरा दिन का साजरा करतात, त्यामागील कारण काय आहे, इतिहास काय आहे, हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात असेल, तर तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखातून मिळणार आहे, म्हणून शेवटपर्यंत वाचत रहा.

जागतिक वसुंधरा दिन | world earth day

जागतिक वसुंधरा दिन म्हणजे काय तो कशासाठी साजरा केला जातो?

कोणता दिन जागतिक वसुंधरा दिन
इतर नावे धरती माता दिवस
केव्हा साजरा करतात ? 22 एप्रिल (दरवर्षी)
उद्देश निसर्गाविषयी संरक्षणाची भावना निर्माण व्हावी

    दिवसेंदिवस वाढते प्रदूषण आणि मानवाची अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्य:स्थितीमागील मुख्य कारण आहे. निसर्गाविषयी संरक्षणाची भावना निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी जागतिक वसुंधरा दिन हा वेगवेगळ्या थीमसह साजरा केला जातो.

  काळाबरोबर, नवीन आव्हानांमध्ये निसर्ग आणि पृथ्वी वाचवण्याची आपल्या सर्वांना गरज आहे. कारण विकासाच्या शर्यतीत पर्यावरण रक्षणाची जबाबदारी धूसर होऊ नये यासाठी वसुंधरा दिनाची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते.

जागतिक वसुंधरा दिन इतिहास

 मानवी जीवन आनंददायी करण्याच्या प्रयत्नाने, मानवी कृती पर्यावरणाच्या हानीचे कारण होत आहेत. आपल्या पृथ्वीची हानी कोणत्या कारणांमुळे होत आहे आणि ती कशी कमी करता येईल हे जाणून घेण्यासाठी जागरूकता आवश्यक आहे. 

  म्हणून याची जाणीव करून देण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे, यासाठी 22 एप्रिल 1970 रोजी अमेरिकेचा सिनेटर गेलॉर्ड नेल्सन याने पहिल्यांदा वसुंधरा दिनाचे आयोजन केले होते.

जागतिक वसुंधरा दिन | world earth day
Image by Freepik

जागतिक वसुंधरा दिन (Earth Day 2023) ची थीम

यावर्षी वसुंधरा दिन 2023 ची थीम आपल्या पृथ्वीवर गुंतवणूक करा (invest in our planet) ही आहे, सरकार, व्यवसाय आणि व्यक्तींनी ग्रहासाठी चांगल्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचे आवाहन आहे.

FAQ : जागतिक वसुंधरा दिन (World Earth Day)

पृथ्वीला वसुंधरा का म्हणतात?

वसु या शब्दाचा अर्थ "संपत्ती" आणि धार म्हणजे "जो धारण करतो." पृथ्वी सर्व प्राणी आणि मानवासाठी आवश्यक असलेल्या गरजा पूर्ण करतात म्हणून तिला वसुंधरा असे म्हणतात.

जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो ?

वसुंधरा दिन 22 एप्रिल असतो.

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url